Thursday, 13 October 2016

1916 क्रमांकावरील एकूण तक्रारीच्या 23 टक्के तक्रारी प्रलंबित

मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या तक्रार क्रमांकावर तक्रारीचा जरी ओघ कमी झाला आहे तरी गेल्या 33 महिन्यात सर्वाधिक तक्रारी नागरी सेवेतील हलगर्जीपणा आणि अनधिकृत बांधकामाच्या असून यात गोवंडी एम पूर्व आणि कुर्ला एल वार्ड अव्वल आहे. यंदाच्या वर्षी एकूण तक्रारीच्या 23 टक्के तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीवरुन समोर येत आहे. विशेष म्हणजे गेल्या 33 महिन्यात 3,39,664 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 3,02,837 तक्रारीचे निवारण झाले आहे आणि 36,647 तक्रारी प्रलंबित आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडे 1916 या तक्रार क्रमांकावार गेल्या 3 वर्षात प्राप्त तक्रारीची माहिती मागितली होती. आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने अनिल गलगली यांस वर्ष 2014, वर्ष 2015 आणि 1 जानेवारी 2016 पासून 30 सप्टेंबर 2016 अशी 33 महिन्याची माहिती उपलब्ध करुन दिली. मुंबईतील 24 पालिका वार्ड कार्यालयातंगर्त सर्वच खात्याची तक्रारी नागरिक 1916 या क्रमांकावर नोंदवितात. गेल्या 33 महिन्यात 3,39,664 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 3,02,837 तक्रारीचे निवारण झाले आहे आणि 36,647 तक्रारी प्रलंबित आहे. 
पालिका अभियंता ज्या परिरक्षण आणि इमारत कारखाने खात्यात प्रामुख्याने कार्यरत आहेत त्या खात्याच्या तक्रारी सर्वाधिक आहे. परिरक्षण खात्यात गोवंडी एम पूर्व( 17,391), चेंबूर एम पश्चिम ( 13,733) आणि कुर्ला एल वार्ड (10,697) सर्वाधिक तक्रारीत अव्वल आहेत. त्यानंतर ए (1368), बी (932), सी (1022), डी (2376),ई (1304), एफ साउथ (852), एफ नार्थ (2168), जी नार्थ (1649), जी साउथ (1343), एच ईस्ट (1963), एच वेस्ट (2216),के ईस्ट (4943), के वेस्ट (4570), पी साउथ (3147), पी नार्थ (3873), आर साउथ (4398), आर सेंट्रल (3074), आर नार्थ (1117), एन (3227), एस (2540), टी (1628) अशी क्रमवारी आहे. तर इमारत व बांधकाम खात्याच्या तक्रारीत कुर्ला एल वार्ड कार्यालय नंबर वन आहे. कुर्ला एल वार्ड(15,845), गोवंडी एम पूर्व (9,457) आणि चेंबूर एम पश्चिम(8,068) अशी क्रमवारी आहे.त्यानंतर ए (630), बी (1011), सी (1180), डी (2208),ई (1435), एफ साउथ (657), एफ नार्थ (843), जी नार्थ (1725), जी साउथ (1239), एच ईस्ट (1563), एच वेस्ट (1625),के ईस्ट (3799), के वेस्ट (3193), पी साउथ (2123), पी नार्थ (3731), आर साउथ (2447), आर सेंट्रल (1763), आर नार्थ (1104), एन (1635), एस (1876), टी (1086) अशी क्रमवारी आहे.
गेल्या 33 महिन्यात तक्रारीच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. वर्ष 2014 मध्ये एकूण तक्रारीची संख्या 1,57,317 होती त्यापैकी 18,578 तक्रारी प्रलंबित आहेत. वर्ष 2015 मध्ये यात लक्षणीय घट होत तक्रारीची संख्या 1,16,625 इतकी झाली. यापैकी फक्त 2,909 तक्रारी प्रलंबित आहेत. 1 जानेवारी 2016 पासून 30 सप्टेंबर 2016 या 9 महिन्यात तक्रारीची संख्या जरी 65,722 असली तरी प्रलंबित तक्रारीची संख्या 15,160 इतकी दर्शविली आहे. यावर्षी 23 टक्के तक्रारी 24 वार्ड स्तरावर प्रलंबित आहेत.
अनिल गलगली यांच्या मते मुंबईतील अधिकांश नागरिकांच्या नेहमीच परिरक्षण तसेच इमारत व कारखाने या खात्याच्या तक्रारी असतात. पालिका प्रशासनाकडून स्वयंस्फूर्त होऊन नागरी कामे आणि सुविधा काम केले जात नाही आणि जेव्हा नागरिक तक्रारी करतात तेव्हा दुर्लक्ष करण्याचा आरोप करत गलगली यांनी दावा केला की यामुळेच प्रलंबित तक्रारीची संख्या 23 टक्क्याच्या वर आहे. यावर तोडगा काढण्यासाठी 'ऑफिसर ऑफ़ मंथली' या धर्तीवर 'बेस्ट वार्ड ऑफिस' किंवा 'वर्स्ट वार्ड ऑफिस' असा नवीन अवार्ड देण्याची सूचना अनिल गलगली यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांस पाठविलेल्या पत्रात केली आहे. जेणेकरुन आत्मग्लानीमुळे 24 वार्ड कार्यालयातील अधिकारी सदविवेकबुद्धिला जागत जबाबदारीने सेवा देतील.

No comments:

Post a Comment