Monday, 8 February 2016

सुरेश वाडकर आणि हरीप्रसाद चौरसिया यांस दिलेले भूखंड ताब्यात घ्या

समाजाच्या संपत्तीची लूट करणारे सुरेश वाडकर आणि हरीप्रसाद चौरसिया यांस दिलेल्या भूखंडाचा होणारा गैरवापर रोखणे आणि कार्यवाही करत त्यांस दिलेले भूखंड परत घेण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांस लिहिलेल्या पत्रात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांस लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की सुरेश वाडकर यांनी वर्तमानपत्रात दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे की ते या भूखंडाचा व्यावसायिक उपयोग करत आहे तर हरीप्रसाद चौरसिया यांनी ज्या प्रयोजनासाठी भूखंड घेतला होता त्या प्रयोजनासाठी कोणताही वापर होत नाही. वाडकर तर या भूखंडाचा वापर लग्न समारंभासाठी करत आहे. निवास आणि व्यावसायिक वापर करणारे ही महान मंडळी नृत्य आणि गायन सारख्या कामासाठी 100% वापर न करत असल्यामुळे कडक कार्यवाही केली जावी आणि दंड आकारत सदर भूखंड शासनाच्या ताब्यात घ्यावे.

No comments:

Post a Comment