जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे रक्तदान महायज्ञ संपन्न
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे दरवर्षी आयोजित होणाऱ्या रक्तदान महायज्ञ या सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून यावर्षी चांदीवली काजूपाडा येथील शिवाजी विद्यालयात कुर्ला पश्चिम तालुका तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन शिवाजी विद्यालयाचे सरचिटणीस अप्पा परब यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजी विद्यालय आणि बैलबाजार येथे 120 तर संतोषी माता मंदिरात 70 असे एकूण 190 रक्तकुपिका संकलित झाल्या. गोरेगाव पूर्व येथे 128 रक्तकुपिका संकलित करण्यात आल्या.
यावेळी उपस्थित आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आपल्या भाषणातून गुरुदेवांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. त्यांनी असे सांगितले की, "रक्तदान हे खरोखरच महादान आहे, आणि यामुळे गरजू व्यक्तींना अनमोल मदत होते." यावेळी आमदार दिलीप लांडे, सायन रक्त पेढीचे डॉ जयवंत गाडे, माजी नगरसेवक हरिश भादींर्गे आणि शाखाप्रमुख चंदन सावंत यांनी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या.
गोरेगाव पूर्व येथील साई लीला फाऊंडेशन येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी 128 रक्तकुपिका संकलित करण्यात आल्या. यावेळी उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार आणि आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांचे स्वागत संतोष नारकर, रश्मी उपाध्याय, सुचिता नारकर, एकनाथ गायकवाड, बाबूराव शिंदे, विलास घाडी, प्रभाकर काके यांनी स्वागत केले.
No comments:
Post a Comment