रेल्वे मंत्रालय तर्फे सुरु होणाऱ्या AC गाडीत First Class च्या प्रवाश्याना प्रवास करण्याची परवानगी देण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांस लिहिलेल्या पत्रात केली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी रेल्वे मंत्री, राज्यमंत्री समेत रेल्वेचे चेयरमेन यांस लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की आज मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत First Class च्या डब्ब्यात प्रचंड गर्दी असते. अश्या परिस्थितीत जी AC गाडी सुरु होणार आहे त्यात First Class च्या पासधारक प्रवाश्याना त्या गाडीत प्रवास करण्याची परवानगी दिली तर नवीन गाडी रिकामी जाणार नाही. जेव्हा पासधारकाच्या पासची मुदत संपेल तेव्हा त्या प्रवाश्याची इच्छा असेल तर नवीन पास मध्ये अतिरिक्त शुल्क आकारत AC गाडी समेट अन्य गाडीत First Class च्या डब्ब्यात प्रवास करण्याची परवानगी दयावी. यामुळे AC गाडीत प्रवास करण्यासाठी प्रवासी मिळतील अन्यथा AC गाडी प्रवासी विना चालवण्याची नामुष्की येईल. कारण AC गाड्याची संख्या अन्य गाड्याच्या तुलनेत कमी असणार. जेणेकरुन AC गाडीसाठी प्रतीक्षा करण्याची वेळ येणार नाही.
No comments:
Post a Comment