आधीच परीक्षा निकाल गोंधळामुळे वादग्रस्त ठरलेली मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील 61 पैकी 36 इमारतीस ओसी नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. या इमारती वर्ष 1975 पासून वर्ष 2008 दरम्यान बांधण्यात आलेल्या आहेत.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेकडे मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील इमारतीस दिलेल्या सीसी, आयओडी, ओसीची माहिती मागितली होती. उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) विशेष कक्षाने अनिल गलगली यांस कळविले की सांताकूझ पूर्व, कोले-कल्याण व्हिलेज, सीटीएस नंबर 4094 येथील जमिनीवर मुंबई विद्यापीठाने बांधलेल्या अधिकांश इमारतींना ओसी दिली गेली नाही.
मुंबई विद्यापीठाने अनिल गलगली यांस कळविले की एकूण 61 इमारतीपैकी फक्त 24 इमारतींना ओसी मिळाली असून 36 इमारतींना ओसी अद्यापपर्यंत मिळाली नाही. एका इमारतीस पार्ट ओसी आहे. ज्यास ओसी देण्यात आलेली आहे त्यात रानडे भवन, टिळक भवन, वर्क शॉप, WRIC गेस्ट हाऊस, एसपी लेडीज हॉस्टेल,न्यू क्लास क्वार्ट्स, महात्मा फुले भवन, ज्ञानेश्वर भवन, यूरसिसन अभ्यास स्टाफ क्वार्ट्स ए, बी, सी, डी, ई, एफ, सीडी देशमुख भवन, डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, प्रेस गोडाऊन, अबुल कलाम बिल्डिंग, फिरोजशहा मेहता भवन, अण्णा भाऊ साठे भवन, पक्षी भवन, ग्लास भवन, कुलगुरु बंगला या इमारतीचा समावेश आहे. कल्चरल सेंटरला पार्टली ओसी आहे.
ज्यास इमारतीस अद्यापही ओसी नाही त्यात ICSSR हॉस्टेल, रीडरर्स क्वार्ट्स 12 A, 12B, 12 C, विद्यार्थी कॅन्टीन, ओल्ड लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स, जेएन लायब्ररी, जेपी नाईक भवन, WRIC प्रशासकीय इमारत, आरोग्य केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील बॉयज हॉस्टेल, एमडीके लेडीज हॉस्टेल, गरवारे इन्स्टिट्यूट ओल्ड, न्यू गरवारे इन्स्टिट्यूट, वर्क शॉप गरवारे, स्टाफ क्वार्ट्स G, पंडिता रमाबाई लेडीज हॉस्टेल, अलकेश दिनेश मोदी गॅलरी, मराठी भवन, आयडॉल इमारत, झंडू इन्स्टिट्यूट, अनेक्स बिल्डिंग, लाईफ सायन्स बिल्डिंग, एक्साम कॅन्टीन, शिक्षक भवन, पोस्ट ऑफिस, सर्व्हट क्वार्ट्स, न्यू लेक्चर कॉम्प्लेक्स, संस्कृत भवन, भाषा भवन, राजीव गांधी सेंटर, आयटी पार्क, शंकरराव चव्हाण टीचर्स टेर्निंग अकादमी, UMDAE हॉस्टेल,, UMDAE फॉकलिटी बिल्डिंग , नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्निकल सेंटर या इमारतीचा समावेश आहे.
अनिल गलगली यांच्या मते कालीना परिसरातील ज्या इमारतीस ओसी नाही त्यात मुंबई विद्यापीठ आणि वास्तुविशारद यांची चूक असून या बाबीची चौकशी करत कारवाई करण्याची मागणी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांस पाठविलेल्या पत्रात केली आहे. ओसी नसलेल्या इमारतीत हजारों विद्यार्थी आणि विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांची ये-जा असून मंजूर आराखडा प्रमाणे काम झाले नसून एफएसआय उपलब्ध असल्यामुळे सुधारित आराखडा सादर करण्याची आवश्यकता आहे, असे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे.
No comments:
Post a Comment