Monday, 6 March 2017

पंतप्रधानानी घोषित केलेला विशेष पैकेज अद्याप पर्यंत बिहार राज्यात नाही पोहचला

निवडणुकीच्या दरम्यान पैकेजची मोठ मोठी घोषणा करण्यात प्रत्येक नेता एक पाऊल पुढेच असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार राज्याच्या विधानसभा निवडणुकीत 1,25,003 कोटींचा पैकेज देण्याची घोषणा केली होती पण ती आता फक्त निवडणूक घोषणा असल्याची बाब आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस केंद्रीय वित्त मंत्रालयातर्फे पाठविलेल्या उत्तरामुळे सिद्ध होत आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान कार्यालयाकडेे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर्फे ज्या राज्यांना पैकेज देण्याची घोषणा केली गेली होती त्या घोषणेच्या अंतर्गत कार्यअहवालाची माहिती 9 डिसेंबर 2016 रोजी मागितली होती. अनिल गलगली यांच्या अर्जास प्रत्यक्ष उत्तर दिले गेले नाही. केंद्रीय वित्त मंत्रालयाचे उप संचालक आनंद परमार यांनी अनिल गलगली यांस कळविले की दिनांक 18 ऑगस्ट 2015 रोजी पंतप्रधाम नरेंद्र मोदी यांनी बिहारासाठी 1,25,003 कोटीच्या विशेष पैकेजची घोषणा केली होती.  यास राज्यातील विकासासाठी पैकेजच्या अंतर्गत घोषित केलेले प्रोजेक्ट/कार्य यास टप्प्याटप्याने कार्यान्वित केले जाणार आहे. तसेच जम्मू आणि कश्मीर साठी  7 नोव्हेंबर 2015 रोजी 80,068 कोटी पैकेज घोषणा केली गेली होती. पुरानंतर बचाव कार्य, दीर्घकालिक पुनर्वसन आणि राज्याच्या विकासासाठी प्रयोजन सांगितले गेले आहे. परंतु बिहार राज्यास एक दमडी सुद्धा दिली गेली नाही याबाबत अनिल गलगली यांनी नाराजगी जाहीर केली आहे. याउलट सिक्कीम राज्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांस कडे 15 जून 2016 रोजी विनंती केली होती की 43,589 कोटीचे आर्थिक दयावे ज्यावर अद्यापपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधा विचार सुद्धा केला नाही.

No comments:

Post a Comment