Monday, 4 January 2016
पश्चिम रेल्वेत सर्वाधिक गर्दीचे स्थानक बोरीवली
चर्चगेट पासून डहाणु रोड पर्यंत 36 रेल्वे स्थानकात धावणा-या पश्चिम रेल्वेत सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानकात बोरिवली असून दररोज 2,87,196 प्रवाशी प्रवास करतात तर कमाईत सुद्धा बोरिवली स्थानक असून रु 16,86,591/- उत्पन्न असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे. दररोज 35,08,469 प्रवाश्यांचा भार सोसणा-या पश्चिम रेल्वेचे उत्पन्न रु 1,99,46,652/- इतके आहे. गर्दीच्या टॉप 10 मध्ये बोरीवली,अंधेरी, नालासोपारा, विरार, भायंदर, मालाड, कांदिवली, गोरेगाव, दादर आणि सांताक्रूझ यांचा समावेश आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे दररोज प्रवास करणारे प्रवाशी, एकुण उत्पन्न आणि स्थानक स्तरावर प्रवाशी संख्या याची माहिती विचारली होती. पश्चिम रेल्वेचे मंडळ वाणिज्य प्रबंधक प्रकाश चंद्रपाल यांनी अनिल गलगली यांस कळविले की चर्चगेट पासून डहाणु रोड पर्यंत 36 रेल्वे स्थानकात धावणा-या पश्चिम रेल्वेचे एकूण उत्पन्न रु 1,99,46,652/- इतके असून दररोज प्रवाशांची संख्या 35,08,469 इतकी आहे. सर्वाधिक गर्दीचे स्थानक बोरीवली असून येथून दररोज 2,87,196 प्रवाशी आपल्या प्रवासाची सुरुवात करतात. त्यानंतर अंधेरी (2,56,771), नालासोपारा (2,02,903), विरार (1,83,456), भायंदर (1,76,844), मालाड (1,72,656), कांदिवली (1,70,747), गोरेगाव (1,56,394), दादर (1,48,583), सांताक्रूझ (146,988),बांद्रा (1,43,675), वसई रोड (1,31,838), चर्चगेट (1,24,521), मीरा रोड (1,17,747), जोगेश्वरी (1,04,217) अशी क्रमवारी आहे. तर सर्वाधिक कमी गर्दीच्या रेल्वे स्थानकात उमरोली असून फक्त 355 प्रवाशी प्रवास करतात. त्यानंतर वैतरणा (2565), वनगाव (5982), केलवे रोड(5591) असा नंबर लागतो.
पश्चिम रेल्वेचे उत्पन्न दररोज 1,99,46,652/- इतके असून येथेही बोरीवलीने प्रथम क्रमांक पटकविला आहे. बोरीवली ( 16,86,591),अंधेरी (14,88,845), नालासोपारा (13,52,587), विरार (13,33,733), भायंदर (9,95,121), वसई रोड (9,34,007), मालाड (9,30,898), कांदिवली (9,29,175), दादर (8,90,606), गोरेगाव (8,39,617), बांद्रा (7,55,846), चर्चगेट (7,43,275) अशी उत्पन्नाची क्रमवारी आहे. तर सर्वाधिक कमी उत्पन्नाच्या रेल्वे स्थानकात उमरोली असून उत्पन्न रु 4930/- आहे त्यानंतर वैतरणा (10,749), केलवे रोड(31,501) वनगाव (40,343) असा नंबर लागतो.
दररोज किती ट्रेन ट्रिप प्रवाश्यांच्या सेवेत असतात याबाबत अनिल गलगली यांस कळविले आले की दररोजच्या ट्रेनची माहिती पब्लिक टाइम टेबलमध्ये प्रकाशित केली जात असून रेल्वे बुक स्टाल येथून ती घ्यावी. सद्या पश्चिम रेल्वेच्या सेवेत 84 रेकस असून 1305 ट्रेन ट्रिप या जनतेच्या सेवेत असतात. विशेष ट्रेनची माहिती सामग्री पातळीवर उपलब्ध नाही. म्हणजे दररोज एका ट्रेनमधून 2689 इतके प्रवाशी प्रवास करतात.
अनिल गलगली यांच्या मते ट्रेन ट्रिपची संख्या प्रवाश्यांच्या तुलनेत कमी असून ती वाढविण्याची आवश्यकता आहे यामुळे प्रवाशी दुर्घटनेच्या संख्येत घट होईल आणि दुर्घटनेमुक्त पश्चिम रेल्वे होईल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment