महाराष्ट्रात नाव आणि जन्मतारीख या सोबत धर्म बदलण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईतील आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या एक ताज्या आरटीआय आकड्यांनुसार महाराष्ट्र राज्यात मुस्लिम धर्माचा त्याग करत 87 टक्के लोकांनी हिंदू धर्मात प्रवेश करत हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे तर हिंदू असलेल्या 69 टक्के लोकांनी हिंदू धर्माचा त्याग करत विविध धर्माचा पर्याय निवडला आहे ज्यात 57 टक्के लोकांनी मुस्लीम धर्मात प्रवेश केला आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाच्या शासकीय प्रेस, लेखन साम्रगी आणि प्रकाशन संचालनालयाकडे धर्म परिवर्तनाची माहिती मागितली होती. या विभागाने अनिल गलगली यांस 10 जून 2014 पासून 16 जानेवारी 2018 या दरम्यान लोकांनी केलेल्या धर्म परिवर्तनाची माहिती दिली. एकूण 1687 लोकांनी आप-आपल्या सोयीने धर्म परिवर्तन केले आहे.
धर्म बदलण्याची तुलना केली तर एकूण 1687 पैकी 1166 हिंदु लोकांनी आपला धर्म बदलला आहे. यात सर्वाधिक 664 लोकांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला आहे. त्यानंतर 258 लोक बुद्धिस्ट बनले आहे.138 ख्रिश्चन, 88 जैन, 11 शीख आणि 1 नव बुद्धिस्ट बनले आहे. हिंदूपासून मुस्लिम बनल्याची टक्केवारी 61 आहे. मुस्लिम पासून हिंदू बनल्याची टक्केवारी 87 आहे. एकूण 263 मुस्लिम पैकी 228 लोक हिंदू बनले आहेत. तसेच 12 बुद्धिस्ट, 21 ख्रिश्चन आणि 2 जैन बनले आहेत.
अन्य धर्मातील लोकांनी सुद्धा परिवर्तन केले आहे. 165 ख्रिश्चनांनी धर्म बदलला आहे. सर्वाधिक 100 लोक हिंदू बनले आहेत.11 बुद्धिस्ट, 5 जैन, 47 मुस्लिम आणि 2 जैन बनले आहेत. 53 बुद्धिस्ट पैकी 17 हिंदू, 14 ख्रिश्चन ,1 जैन आणि 21 मुस्लिम बनले आहेत. 16 शीख पैकी 2 ख्रिश्चन, 2 जैन आणि 14 मुस्लिम बनले आहेत. 9 जैन पैकी 2 हिंदू, 2 ख्रिश्चन, 4 मुस्लिम आणि 1 शीख बनले आहेत. 11 अन्य पैकी 6 हिंदू, 2 बुद्धिस्ट, 1 जैन, 1 मुस्लिम आणि 1 शीख बनले आहेत. नव बुद्धिस्ट 4 होते त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश करत शत प्रतिशत धर्म बदलला आहे.
अनिल गलगली यांच्या मते महाराष्ट्रातील ही आकडेवारी अधिकृत आहे. ज्यांस सरकारी कामकाजात किंवा अन्य कामात धर्म परिवर्तन झाल्याचा पुरावा देण्याची आवश्यकता असते अश्या लोकांना नोंदणी करावी लागते.
No comments:
Post a Comment