Wednesday, 26 April 2017

मुंबई मेट्रो 3 चा विस्तृत प्रकल्प अहवाल संकेतस्थळावर, एमएमआरडीए प्रशासनाचा प्रतिसाद नाही

कोणताही प्रकल्प राबविताना शासन किंवा प्राधिकरण विस्तृत प्रकल्प अहवाल बनविते ज्यात त्या प्रकल्पाची इंत्यभूत माहिती असते. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर मुंबई मेट्रो 3 चा विस्तृत प्रकल्प अहवाल एमएमआरसीएल तर्फे संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आला आहे. पण एमएमआरडीए प्रशासनाने अद्याप पर्यंत यास सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिनांक 3 फेब्रुवारी 2017 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एमएमआरडीए आयुक्त यूपीएएस मदान आणि एमएमआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांस लेखी पत्र पाठवून मुंबई शहरात राबवित असलेल्या सर्व प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल संकेतस्थळावर प्रदर्शित करण्याची मागणी केली होती. एमएमआरसीएलने सदर मागणीचा सकारात्मक विचार करत मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल संकेतस्थळावर प्रदर्शवत केला. यामुळे आता नागरिकांना घरबसल्या विस्तृत प्रकल्प अहवाल पाहता येईल.  पण एमएमआरडीए प्रशासनाने अद्याप पर्यंत विस्तृत प्रकल्प अहवाल संकेतस्थळावर प्रदर्शित करण्याचे टाळले आहे. अनिल गलगली यांच्या मते मुंबईतील सर्व प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल बनविला जातो पण तो सामान्य नाग

रिकांस उपलब्ध केला जात नाही. त्यासाठी प्रचंड रक्कम आकारत विकला जातो. असा विस्तृत प्रकल्प अहवाल संकेतस्थळावर प्रदर्शित केला गेला तर सामान्य नागरिकांना त्या प्रकल्पाच्या बाबतीत असणारा गैरसमज टाळण्यासाठी मदत होईल. 

No comments:

Post a Comment