लालबाग उड्डाणपुलास काही ठिकाणी चिरा पडल्यामुळे वाहतूक बंद
करण्यात आली होती. पालिकेस हस्तांतरित केलेल्या MMRDA, MSRDC आणि PWD रस्त्यांचे
सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांस पाठविलेल्या पत्रात केली आहे.
अनिल गलगली यांनी पत्रात नमूद केले आहे की SCLR ची अवस्था
लालबागपेक्षाही वाईट असून 40 टक्के भाग उखडलेला असून येथेही चिरा सर्वत्र आहेत. शाबासकी
मिळविण्यासाठी कंत्राटदार घाई घाईने काम पूर्ण करत असताना गुणवत्ता आणि उत्तम
साम्रगी याकडे दुर्लक्ष होते आणि अधिकारी डोळे बंद करत त्यास मंजुरही करतात.
तरी पालिकेस हस्तांतरित केलेल्या MMRDA, MSRDC आणि PWD रस्त्यांचे
सुरक्षा ऑडिट करताना काही बदल असल्यास त्यास कंत्राटदाराकडून करुन घेत कार्यवाही
करावी, अशी मागणी अनिल
गलगली यांनी केली. तसेच या सर्व कामात जे अधिकारी गुंतलेले होते त्यावर कार्यवाही
करत होणारे नुकसान त्यांच्या वेतनातून वसूल करत अश्या कंत्राटदारावर कार्यवाही करत
काळया यादीत टाकावे, असे गलगली यांनी नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment