Sunday, 1 December 2024

अण्णा परब यांच्या आठवणींना दिला उजाळा

अण्णा परब यांच्या आठवणींना दिला उजाळा

मुंबई आणि कोकण परिसरात भरीव शैक्षणिक कार्य करणारे वसंत शंकर परब (  अण्णा परब ) यांच्या 74 व्या जयंती निमित्ताने चांदिवली येथील गुरुकुल कोचिंग क्लासेस येथे आयोजित कार्यक्रमात त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

कै अण्णा परब प्रतिष्ठान तर्फे आयोजित कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाची आठवण काढण्यात आली. यावेळी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, एनसीपी जिल्हाध्यक्ष अरशद अमीर, उत्तर मध्य जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष वजीर मुल्ला, शिवसेना उप विभागप्रमुख राजू परब, संजय कालसेकर, प्रतिष्ठानाचे अध्यक्ष रविंद्र हिंगमिरे, बाबू बत्तेली, एड कैलास आगवणे, राजू अप्पा परब, सुभाष गायकवाड, रत्नाकर शेट्टी, रियाझ मुल्ला, मनाली गायकवाड, रेणू रमेश सिंह, मंदा खरटमोल, कृष्णा व्हटकर, स्वप्नील चव्हाण, अजीज खान, अनिल लोंढे, शिवाजी लोंढे, लतीफ खान, इफ्तेखार खान, पवन जैन, मोहसीन शेख, असफाक खान, श्याम थापा, पंकज शर्मा, इश्वरचंद, प्रतिक प्रजापती उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एड कैलास आगवणे यांनी केले तर आभार बाबू बत्तेली यांनी मानले.

No comments:

Post a Comment