कुर्ल्यात 141 वा चंपाषष्ठी यात्रोत्सवाचा शुभारंभ
कुर्ल्यातील प्राचीन असे श्री सर्वेश्वर महादेव देवालयात श्री सर्वेश्वर महादेवाच्या साक्षीने 141 वा चंपाषष्ठी यात्रोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री सर्वेश्वर महादेवाची पालखी मिरवणूकीपूर्वी विशेष पूजा आयोजित करण्यात आली. दिनांक 7 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2024 पर्यंत जत्रोत्सव सोहळयात श्री सर्वेश्वर कुस्ती फड आणि त्यानंतर श्रीरामाची जत्रा साजरी करण्यात येईल.
पुजारी मंदार जोशी यांनी विधिवत पूजा संपन्न केली. यावेळी आमदार मंगेश कुडाळकर, अनिल गलगली भाऊ कोरगांवकर, डॉ महेश पेडणेकर, किसन मदने, डॉ अनुराधा पेडणेकर, मनोज नाथानी, चंद्रकांत सावंत, रवींद्र कोचले, विनायक गाढवे, प्रदीप भोसले, बबन शेळके, उमेश गायकवाड, प्रमोद शिरगावकर, प्रेमचंद मदने, चेतन कोरगांवकर, प्रकाश चौधरी उपस्थित होते.
141 वर्षापूर्वी स्वदेशी मिल मधील हिंदू कामगारांनी जमा केलेल्या वर्गणीतून व टाटांकडून वाडिया मार्फत उपलब्ध करून दिलेल्या जागेत स्वदेशी मिल कामगारांनी श्री सर्वेश्वर महादेव मंदिराची स्थापना व उभारणी करून पहिला चंपाषष्ठी उत्सव बुधवार दि. 5 डिसेंबर 1883 रोजी साजरा करण्यात आला. त्यानंतर अविरत 141 वर्षे मुंबापुरातील ही परंपरा स्वदेशी मिल आणि न्यु मिल मधील कामगार आणि कुर्ला व चुनाभट्टी मधील स्थानिक भाविकांच्या माध्यमातून चंपाषष्ठी व जत्रा उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात येते.
No comments:
Post a Comment