सेरेब्रल पाल्सी असोसिएशनतर्फे ख्रिसमस आनंदोत्सव साजरा
सांताक्रूझ पूर्व कालीना येथे सेरेब्रल पाल्सी असोसिएशन संस्थेच्या बहुविकलांग विद्यार्थ्यांसाठी इंडिया फॅक्टरींग ॲन्ड फायनान्स सोलूशन्स प्रा.लि. आणि स्वराज्य युथ फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने ख्रिसमस विशेष आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी आंतर स्पर्धा, म्युझिक शो आणि संगीताच्या तालावर सामुदायिक नृत्य यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास सीपीए सल्लागार व माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, रेखा देशपांडे, स्वराज्य युथ फोरमचे संस्थापक चेतन कोरगांवकर, सीपीए सल्लागार व रुग्णमित्र विनोद साडविलकर, गौरी दास (एचआर व मार्केटिंग प्रमुख), अमोल देशपांडे (वित्तीय नियंत्रक), रितू ब्रीद, डिंपल छेड़ा यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment