Wednesday, 4 December 2024

सामाजिक आणि राजकीय समीकरणांचा समतोल साधणारा चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस

सामाजिक आणि राजकीय समीकरणांचा समतोल साधणारा चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या राजकारणातील कार्यक्षम नेते म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस आता तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत. त्यांची भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विधिमंडळ गटाच्या नेतेपदी एकमताने निवड झाली. राज्यातील सामाजिक आणि राजकीय समीकरणे जुळवून भाजपने योग्य चेहरा निवडला आहे.
 

भारतीय जनता पक्ष (भाजप) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) यांनीही प्रभावी कामगिरी केली. भाजपने 132, शिवसेनेच्या शिंदे गटाला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला 41 जागा जिंकून ऐतिहासिक निकाल आणण्यात यश आले. तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पक्षाने 2 तर इतरांनी 10 जागा जिंकल्या. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत आधीच भूमिका स्पष्ट केली होती. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. या बदलामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित होते.

◆ ३१वे मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ पुन्हा सुरू होत असून, त्यामुळे संपूर्ण राज्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.

◆ तिसऱ्यांदा मुख्यमंत्री 

देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून ही तिसरी वेळ आहे, जो त्यांच्या नेतृत्वाचा आणि लोकप्रियतेचा पुरावा आहे.

◆ समतोल साधण्याची क्षमता

देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस हे संघटना आणि सरकार यांच्यात समतोल राखण्याच्या त्यांच्या अद्वितीय क्षमतेसाठी ओळखले जातात, ज्यामुळे त्यांना पक्ष आणि जनतेचा विश्वास जिंकण्यात मदत झाली आहे.

◆  स्थैर्याचे नेतृत्व

देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व हे नेहमीच महाराष्ट्राच्या विकासाचे आणि स्थैर्याचे प्रतीक राहिले आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा शेवटचा पाच वर्षांचा कार्यकाळ समाधानकारक मानला गेला, जिथे त्यांनी पायाभूत सुविधा, शहरी विकास आणि शेतकरी कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या.


◆ मुख्यमंत्री म्हणून यश

त्यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात मेट्रो प्रकल्प, रस्तेबांधणी, जलव्यवस्थापन, औद्योगिक गुंतवणुकीला नवी दिशा मिळाली. त्यांनी महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांसाठी आकर्षक राज्य बनवले.

◆ उपमुख्यमंत्री म्हणून योगदान

उपमुख्यमंत्री असतानाही त्यांनी अर्थ आणि गृह खाते प्रभावीपणे सांभाळून राज्याच्या विकासाचा आलेख उंचावला. त्यांचे निर्णय घेण्याचे कौशल्य आणि संकट व्यवस्थापनातील कार्यक्षमता वाखाणण्याजोगी होती.

◆ विकासकामांना प्राधान्य

देवेंद्र वफडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यामुळे ते अपूर्ण विकासकामे वेगाने पूर्ण करून राज्यातील प्रत्येक क्षेत्राला प्रगतीपथावर नेतील, अशी अपेक्षा आहे.


त्यांच्या सक्षम नेतृत्वाने राज्याला पुन्हा एकदा नव्या उंचीवर नेण्याची अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेला आहे. त्यांच्या यशामुळे राज्याच्या विकास आणि प्रशासनात नवीन उंची गाठण्याची आशा निर्माण झाली आहे.


अनिल गलगली
माहिती अधिकार कार्यकर्ते

No comments:

Post a Comment