Tuesday, 31 October 2017

मुंबई ते अहमदाबाद रेल्वेत 40 टक्क्यांहून अधिक सीटस् रिकाम्या

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी 1 लाख कोटी खर्च करण्यासाठी उत्सुक मोदी सरकारने सद्यस्थितीतील मुंबई ते अहमदाबाद रेल्वे गाड्यांचा अभ्यास केला नसून मुंबई ते अहमदाबाद रेल्वेत गेल्या 3 महिन्यात 40 टक्के तर अहमदाबाद ते मुंबई 44 टक्के सीट्स रिकाम्या असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पश्चिम रेल्वेने दिली आहे. या 3 महिन्यात पश्चिम रेल्वेस 29.91 कोटीच्या महसूलावर पाणी सोडावे लागले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पश्चिम रेल्वेकडे मुंबई ते अहमदाबाद आणि अहमदाबाद ते मुंबई अश्या 3 महिन्याची विविध माहिती मागितली होती. पश्चिम रेल्वेचे मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक मनजीत सिंह यांनी अनिल गलगली यांस 1 जुलै 2017 पासून 30 सप्टेंबर 2017 पर्यंतची माहिती दिली. यात मुंबई ते अहमदाबाद अश्या 30 मेल एक्सप्रेसने 4,41,795 प्रवाश्यानी प्रवास केला प्रत्यक्षात 7,35,630 सीट्स होत्या.एकूण महसूल रुपये 44,29,08,220 /- येणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात रुपये 30,16,24,623/- महसूल प्राप्त झाला. रुपये 14,12,83,597 इतके आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. तर अहमदाबाद ते मुंबई दरम्यान 31 मेल एक्सप्रेसची सुविधा असून 3,98,002 प्रवाश्यानी प्रवास केला असून प्रत्यक्षात 7,06,446 सीट्स होत्या. रुपये 15,78,54,489/- इतके आर्थिक नुकसान सहन 

करणा-या पश्चिम रेल्वेस रुपये 42,53,11,471 इतका महसूल अपेक्षित होता पण फक्त रुपये 26,74,56,982/- इतका महसूल प्राप्त झाला.

यात दुरोतों, शताब्दी, गुजरात मेल,भावनगर, सौराष्ट्र, विवेक, भुज, लोकशक्ती सारख्या गाड्यांचा समावेश आहे. अहमदाबाद मंडळ अभियंताने अनिल गलगली यांस कळविले की अहमदाबाद साठी नवीन गाडीचा कोणताही प्रस्ताव त्यांस प्राप्त झाला नाही. 12009 शताब्दी ज्या कार चेअर साठी प्रसिद्ध आहे त्यात अहमदाबाद येथे जाताना 72,696 पैकी फक्त 36117 प्रत्यक्ष प्रवासी लाभले आणि रुपये 7,20,82,948 ऐवजी फक्त रुपये 4,11,23,086 इतकीच कमाई झाली तर Executive चेअरच्या 8,216 पैकी 3,468 सीटसवर प्रवासी होते. रुपये 1,63,57,898 ऐवजी रुपये 64,14,345 कमाई झाली. अहमदाबाद येथून मुंबईकडे परतताना 12010 या शताब्दीमध्ये 67,392 पैकी 22,982 सीट्स वर प्रवाश्यानी प्रवास केला आणि रुपये 6,39,08,988 ऐवजी रुपये 2,51,41,322 इतकीच कमाई झाली. तर Executive चेअरच्या 7505 पैकी फक्त 1469 सीट्स वर प्रवासी होते ज्यांच्याकडून रेल्वेस रुपये 1,45,49,714 ऐवजी रुपये 26,41,083 महसूल प्राप्त झाला.  सर्व गाड्यांची स्थिती समान असून सर्वाधिक मागणी स्लीपर क्लाससाठी असताना त्याचा रेल्वे मंत्रालय गांभीर्याने विचार करत नाही.

अनिल गलगली यांच्या मते अहमदाबाद येथे जाण्यासाठी सर्वाधिक गर्दी ही स्लीपर क्लास असून महाग तिकिटे असलेल्या गाड्यातील सीट्स शत प्रतिशत कधीच भरल्या जात नाही. केंद्र आणि राज्य सरकार सोबत रेल्वे मंत्रालयाने या बाबीचा अभ्यास करण्याऐवजी बुलेट ट्रेन हा निवडलेला पर्याय सर्व सामान्य जनतेसाठी सोयीस्कर नाही. 

No comments:

Post a Comment