बहुप्रतिक्षित असा कुर्ला पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा असा कुर्ला सबवे चे काम पूर्ण झाले लवकरच तो नागरिकांसाठी सुरु होईल. मध्य रेल्वेने 3.84 कोटी आतापर्यंत खर्च केले असून आता मध्य रेल्वे 2.11 कोटी आणि पालिका 2.94 कोटी असे 5.05 कोटी खर्च केले आहे.
कुर्ल्याचा सबवे चे काम हे गेल्या 14 वर्षापासून प्रलंबित आहे. पालिका आणि मध्य रेल्वेच्या समन्वयाच्या अभावी काम रखडलेले होते. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सतत केलेल्या पाठपुराव्यानंतर कुर्ला सबवे जवळपास पूर्ण झाला आहे. कुर्ला सबवेची एकूण लांबी 129.90 मीटर, रुंदी 7.60 मीटर आणि उंची 2.60 मीटर इतकी आहे. पालिकेने फक्त पश्चिमेकडील पोहोचमार्गाचे काम केले असून त्याचा एकूण खर्च रु. 2 कोटी 94 लाख 88 हजार 383 झाला आहे. हे काम करण्यासाठी मे.जे.एल.कंस्ट्रक्शन कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. काम 15 फेब्रुवारी 2016 रोजी सुरु झाले असून कामाचा कालावधी 9 महिन्याचा (पावसाळा वगळून) होता. आतापर्यंत रेल्वेने रु. 3 कोटी 84 लाख 43 हजार रक्कम खर्च केले आहे. सोलापूर येथील मेसर्स महेश रुपचंदाणी ने दिनांक 21 ऑक्टोबर 2014 रोजी काम सुरु झाले होते. सबवे चे काम मध्य आणि हार्बर रेल्वेच्या खालील भागात होत आहे.
अनिल गलगली यांच्या मते कोटयावधीचा खर्च करुनही गेल्या 15 वर्षापासून कुर्ला सबवे सुरु होऊ शकला नाही. कुर्ला सबवे सुरु होताच याचा लाभ हजारों पादचा-यांस होईल आणि रेल्वे दुर्घटनेत घट होण्यास मदत मिळेल, असा विश्वास अनिल गलगली यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment