महाराष्ट्र शासन 4 कोटी झाडे लावण्याचा विक्रम करण्यासाठी मैदानात उतरली असताना मुंबई महानगरपालिका दररोज 7 झाडांना कापण्याची परवानगी देण्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पालिकेच्या उद्यान खात्याने दिली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेच्या उद्यान खात्यास गेल्या 3 वर्षात पालिकेने झाडे कापण्यासाठी दिलेल्या परवानगीची माहिती मागितली होती. पालिकेच्या उद्यान उप अधीक्षक यांनी अनिल गलगली यांस वर्ष 2014, वर्ष 2015 आणि वर्ष 2016 या वर्षात कापली गेलेली झाडे, पुर्नरोपित आणि राखलेली झाडांची संख्या दिली आहे. गेल्या 3 वर्षात एकूण 7842 झाडे कापली गेली. 13070 झाडे पुर्नरोपित केली गेली तर 28787 झाडे राखली गेली. 3 वर्षात सर्वात जास्त 3819 झाडे वर्ष 2016 या वर्षात कापली गेली. यात 1830 खाजगी , 1448 शासन आणि2 541 पालिकेने विविध कामासाठी कापली आहे. त्यानंतर 2720 झाडे वर्ष 2015 आणि 1303 झाडे वर्ष 2014 कापली गेली. पालिकेने दावा केला आहे की 3 वर्षात एकूण 13070 झाडे पुर्नरोपित केली गेली. वर्ष 2015 या वर्षात सर्वात जास्त 5054 झाडे खाजगी , शासन आणि पालिकेने पुर्नरोपित केली आहे. वर्ष 2016 या वर्षात ही संख्या कमी होत 3770 इतकी झाली आहे. पालिकेने अजून एक दावा केला आहे की गेल्या 3 वर्षात एकूण 49060 झाडांचे वृक्षारोपण केले आहे. वर्ष 2014 मधील 14253 ही संख्या वाढत वर्ष 2015 या वर्षात 16157 झाली तर वर्ष 2016 या वर्षात ही संख्या वाढत 18650 पर्यंत झाली आहे.
अनिल गलगली यांच्या मते विकासाच्या नावाखाली सर्वच झाडे तोडण्याच्या कामात जास्त रस घेतात. पालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती जेव्हा मनात येईल तेव्हा झाडे कापण्याची परवानगी देत असल्यामुळे अप्रत्यक्ष ग्रीन मुंबई चळवळीस ही बाब घातक आहे. त्यासाठी जेव्हा झाडे तोडण्यासाठी अर्ज येईल तेव्हा समितीच्या बरोबर स्थानिक नागरिकांना निरीक्षणासाठी आमंत्रित करावे जेणेकरुन विनाकारण झाडे तोडण्याचा प्रकार बंद होईल.
No comments:
Post a Comment