Tuesday, 17 July 2018

डॉ नीरज हाटेकर यांनी पीएचडी करण्यासाठी केलेल्या वाड्मय चोरीचा चौकशीचा अहवाल तयार

मुंबई विद्यापीठाचे डॉ नीरज हाटेकर यांनी पीएचडी करण्यासाठी केलेल्या वाङमय चोरीचा चौकशीची अहवाल तयार झाला असून व्यवस्थापन परिषदेकडे निर्णयासाठी सादर केल्यानंतर त्या अहवालाची प्रत दिली जाणार असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई विद्यापीठाने दिली आहे.

डॉ नीरज हाटेकर यांस वर त्यांची पत्नी रजनी माथुरच्या प्रबंधातून वाङमय चोरी केल्याचा आरोप होताच कुलपती आणि राज्यपाल विद्यासागर राव यांनी चौकशीचे आदेश दिले होते. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी डॉ नीरज हाटेकर यांची झालेली चौकशी आणि त्याबाबतीत तयार झालेल्या अहवालाची प्रत मागितली होती. मुंबई विद्यापीठाच्या प्रबंध विभागाचे उप कुलसचिव यांनी अनिल गलगली यांस कळविले की मुंबई विद्यापीठाचे डॉ नीरज हाटेकर यांच्या वाङमय चोरीचा चौकशीचा अहवाल व्यवस्थापन परिषदेकडे निर्णयासाठी सादर केल्यानंतर त्या अहवालाची प्रत देण्यात येईल. अनिल गलगली यांच्या मते चौकशी अहवाल लवकरात लवकर सार्वजनिक करणे आवश्यक आहे. अहवाल व्यवस्थापन परिषदेकडे सादर करण्यात दिरंगाई करण्याऐवजी तत्काळ कार्यवाही अपेक्षित आहे जेणेकरून मुंबई विद्यापीठाच्या प्रतिमा मलिन होणार नाही.

No comments:

Post a Comment