महाराष्ट्रातील नवीन सरकारातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद सोडता सर्वच मंत्र्यानी मंत्रिमंडळाच्या बैठकीस शतप्रतिशत उपस्थिती राहिले नसून कृषिमंत्रीे पांडुरंग फुंडकर दांडी मारण्यात अव्वल असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्य सचिव कार्यालयाने दिली आहे. 5 टॉप दांडी बहादुर मंत्र्यामध्ये पांडुरंग फुंडकर, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, संभाजी निलंगेकर-पाटील, राजकुमार बडोले यांचा क्रमांक लागतो.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्य सचिव कार्यालयाकडे मंत्रिमंडळाच्या बैठकी आणि मंत्र्याची उपस्थितीची माहिती मागितली होती. मुख्य सचिव कार्यालयाचे अवर सचिव आणि जन माहिती अधिकारी केळकर यांनी अनिल गलगली यांस कळविले की दिनांक 17 जुलै 2016 पासून 22 मे 2017 या कालावधीत एकूण 35 मंत्रिमंडळाच्या बैठकी झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद वगळता 22 च्या 22 मंत्र्यानी दांडी मारली. या दांडी बहादुरीत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी अव्वल क्रमांक पटवित 35 पैकी 11 वेळा अनुपस्थित होते. त्यानंतर वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही 9 वेळा अनुपस्थित राहत दुसरा क्रमांक पटकविला. यानंतर ग्रामीण आणि महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि कामगार मंत्री संभाजी निलंगेकर-पाटील हे तिघे प्रत्येकी 8 वेळा अनुपस्थित होते. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक सरंक्षण मंत्री गिरीष बापट आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता हे दोघे 7 वेळा अनुपस्थित होते. जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा राम शिंदे आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम हे 6 वेळा अनुपस्थित होते. सहकार मंत्री सुभाष देशमुख, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबन लोणीकर हे तिघे 5 वेळा अनुपस्थित होते. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ दीपक सावंत हे प्रत्येकी 4 वेळा तर पर्यटन मंत्री जयकुमार रावळ 3 वेळा आणि वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन 2 वेळा अनुपस्थित होते. प्रत्येकी 1-1 वेळा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, आदिवासी मंत्री विष्णू सावरा आणि पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर अनुपस्थित होते.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचा विकास आणि धोरणाबाबत महत्वाची चर्चा होत असून अश्या बैठकीत मंत्र्यानी सर्व कामे सोडून उपस्थित राहण्याची अपेक्षा अनिल गलगली यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment