Wednesday, 8 February 2017

एमएमआरडीएच्या सर्व स्कायवॉकची सुरक्षा ऑडिट करा

नुकतेच दहिसर येथील स्कायवॉकचा काही भाग कोसळला आणि 2 प्रवाश्याना दुखापत झाली.  वर्ष 2011 मध्ये हा स्कायवॉक जनतेस सुरु केला असून 15 कोटी खर्च केले आहेत. एमएमआरडीए प्रशासनाने बांधलेल्या सर्व स्कायवॉकची सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस करत दोषी अधिकारीवर्गावर कार्रवाई करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यूपीएस मदान यांस पाठविलेल्या पत्रात अनिल गलगली यांनी नमूद केले आहे की 5 वर्षात दुर्घटना होणे ही बाब गंभीर आहे. वर्ष 2011 मध्ये दहिसर स्कायवॉक जनतेस सुरु केला असून 15 कोटी खर्च केले आहेत. फक्त मुंबईत 36 स्कायवॉक असून 865 कोटी खर्च केले आहेत. पुष्कळ स्कायवॉकचे बांधकाम घाईने केले असल्यामुळे तेथेही दहिसर सारखी दुर्घटना होऊ शकते. या सर्व स्कायवॉकची सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून ऑडिट करणे आवश्यक आहे जेणेकरुन जे सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून दुर्घटनेस आमंत्रण देऊ शकतात त्यावर उपाय योजना करत दुरुस्ती केली जाऊ शकते. तसेच या कामासाठी ज्या अधिकारी वर्गाची विशेष नेमणूक एमएमआरडीए प्रशासनाने केली होती त्या अधिकारी वर्गाची चौकशी करत कार्यवाही करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अनिल गलगली यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment