Saturday, 11 February 2017

'मी मतदान करणार' आवाहन जाहिरातीत मिस कॉलचा नंबर निघाला अभिनेत्रीचा

'मी मतदान करणार' या प्रतिज्ञा अंतर्गत जाहिराती, बॅनर, फलक यावर प्रकाशित चुकीचा मिस कॉल नंबर हा चक्क एका अभिनेत्रीचा असल्यामुळे पालिकेला लाखोंचा फटका बसला आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या अधिका-यांकडून झालेले नुकसान वसूल करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांस पाठविलेल्या पत्रात केली आहे.

 

मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2017 अंतर्गत निवडणूक विभागाच्या अधिपत्याखाली  'मी मतदान करणार' या प्रतिज्ञा अंतर्गत एक नंबर प्रकाशित करण्यात आला होता ज्यावर नागरिकांना मिस कॉल देण्याचे आवाहन करण्यात आले होते. पालिकेने जाहिराती, बॅनर, फलक यावर लाखोंचा खर्च केला पण दुदैवाने तो नंबर चुकीचा होता आणि त्याचा फटका एका अभिनेत्रीला बसला. इतकी मोठी घोडचूक होऊन सुद्धा आजपर्यंत एकही फलक, बॅनर पालिकेने काढण्याची कार्यवाही केली नाही आणि तशीच सूचना सुद्धा प्रकाशित केली नाही. यामुळे ज्या उद्देश्याने पालिकेने कार्यवाही केली ती साध्य झाले नाही आणि खर्चही झाल्याची खंत अनिल गलगली यांनी व्यक्त केली.

अनिल गलगली यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांस मागणी केली आहे की सर्व फलक आणि बॅनर काढावे आणि अचूक मिस कॉल प्रसिद्ध करावा तसेच मी मतदान करणार' या प्रतिज्ञा अंतर्गत प्रकाशित चुकीचा नंबर पहाता संबंधित अधिकारीवर्गाची जबाबदारी निश्चित करत जाहिराती, बॅनर, फलक यावर झालेला खर्चाची वसुली करावा.

No comments:

Post a Comment