Thursday, 7 July 2016

लोकायुक्तांच्या आदेशानंतर पालिकेचे 2 मुख्य अभियंत्यांस झाली अटक

मुंबई महानगरपालिकेने रस्ते कामात झालेला भ्रष्टाचार आणि सावळा गोंधळ लक्षात घेता चौकशी करत 6 कंत्राटदारावर गुन्हे दाखल केले. ही वस्तुस्थिती असताना ज्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल झाले त्यापैकी आरपीएस इन्फ्रा प्रोजेक्ट आणि जे कुमार यांस हँकॉकसह यारी रोड, मिठी नदी आणि विक्रोळी उड्डाणपूलाचे नवीन कंत्राट बहाल करणे तसेच गोरेगाव-मुलुंड लिंक रोड या 1300 कोटीच्या कामात पुनश्च कंत्राटदारावर दाखविलेली मेहरबानीची चौकशी करत कार्यवाही करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्याचे लोकायुक्त एम एल तहलियानी यांच्याकडे केली होती. लोकायुक्त लोकआयुक्त श्री तहलियानी यांच्या आदेशानंतर पालिकेचे 2 मुख्य अभियंत्यांस आझाद मैदान पोलीसांनी अटक केली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्याचे लोक आयुक्त एम एल तहलियानी यांच्याकडे पाठविलेल्या तक्रारीत आश्चर्य व्यक्त केले होते की एकीकडे ज्या कंत्राटदारावर पालिका गुन्हे दाखल करते त्याच कंत्राटदाराना नवीन काम देते, हा प्रकार विचित्र आहे. त्याचशिवाय गोरेगाव-मुलुंड लिंक रोड या 1300 कोटीच्या कामात सुद्धा एफआयआर दाखल झालेल्या कंत्राटदारावर पालिका मेहरबान झाले असून नुकतेच निविदेच्या छाननीअंती त्यापैकीच 2 पात्र ठरले आहेत. अनिल गलगली यांनी मागणी केली होती की सर्व बाबीची दखल घेत महानगरपालिका आयुक्तांकडून हँकॉकसह यारी रोड, मिठी नदी आणि विक्रोळी उड्डाणपूल तसेच गोरेगाव-मुलुंड लिंक रोड या नवीन कामाचा वस्तुस्थितीवर आधारित अहवाल मागवित मुंबईकरांची आणि पालिकेची होणारी फसवणूक थांबवावी तसेच यापूर्वी दाखल गुन्ह्याबाबत सू-मोटो घेत कार्यवाही करावी. अनिल गलगली यांच्या तक्रारी नंतर राज्याचे लोक आयुक्त एम एल तहलियानी यांनी जबाबदार अधिकारीवर्गावर भ्रष्टाचार निरोधक कायदाअन्वये कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मुंबई पोलीसांनी रस्ते विभागाचे मुख्य अभियंता अशोक पद्मसिंह पवार(57) आणि दक्षता विभागाचे मुख्य अभियंता उदय नामदेव मुरुडकर (54) यांस अटक केली आहे.

No comments:

Post a Comment