Sunday, 9 March 2025

महिला दिनानिमित्त शाश्वत विकास ध्येये परिचय कार्यक्रमाचे आयोजन

महिला दिनानिमित्त शाश्वत विकास ध्येये परिचय कार्यक्रमाचे आयोजन

रुग्ण मित्र संचालित प्रसन्न फाउंडेशन आणि अनिद् य कोचिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाश्वत विकास ध्येये परिचय कार्यक्रम’ चेंबूर सिंधी कॅम्प सोसायटी येथे उत्साहात संपन्न झाला. श्रद्धा अष्टीवकर व डॉ. छाया भटनागर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली, तसेच रुग्ण मित्र सामाजिक कार्यकर्ता विनोद साडविलकर आणि गणेश सानप उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून सिद्धेश परब यांनी कार्यशाळेला दिशा दिली.

या कार्यक्रमात शासनाच्या विविध योजना आणि सेवा यांचा प्राथमिक परिचय देण्यात आला. यात शिक्षण, बँकिंग, वित्तीय सेवा, विमा, व्यवसाय आणि उद्योजकता, आरोग्य आणि कल्याण, कृषी, ग्रामीण आणि पर्यावरण, सार्वजनिक सुरक्षा, कायदा आणि न्याय, समाज कल्याण व सक्षमीकरण, विज्ञान, आयटी, क्रीडा, संस्कृती, कौशल्य विकास, रोजगार, प्रवास आणि पर्यटन यांचा समावेश होता.

युवा पिढी आणि गरजूंसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कार्यशाळांचे आयोजन करून त्यांना साक्षर करण्याचा मानस या उपक्रमामागे आहे. कंपनी सामाजिक दायित्वातून (CSR) विविध जिल्ह्यांत शाश्वत विकास ध्येये राबवण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी प्रकल्प नियोजन, ताळेबंद आणि समन्वयाच्या महत्त्वपूर्ण गोष्टींवर भर देण्यात आला.

कार्यक्रमाला अनिद् य कोचिंग इन्स्टिट्यूटच्या दीपाली पवार, पूर्वी गायकवाड, रेणू गुप्ता, आर्या केसर, लक्ष रामास्वामी यांसह शिक्षक, विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुग्ण मित्र साथी संस्थेचे रमेश चव्हाण, प्रज्वला इंगळे, शांताराम मोरे, किरण गिरकर, चारुदत्त पावसकर, हेमलता गाडेकर, श्रीविद्या सरवणकर, गोविंद मोरे, हर्षल जाधव, जयकिशन डुलगच, महेंद्र पवार, कमलेश साळकर, मनीषा साडविलकर, पूजा निकाळजे, प्रकाश राणे, किरण साळवे यांनीही सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment