चेंबूर हायस्कूलच्या डॉ. केशव हेगडेवार सभागृहात सभागृहात शौर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या द्वितीय वर्धापनदिन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या सोहळ्याचे उद्घाटन प्रख्यात माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाला समाज विकास अधिकारी कविता कर्दळे, डॉ. कॅरेन टेरी रझा, भूषणा पाठारे, छाया भटनागर, विनोद साडविलकर, कृष्णा कदम, डॉ. छाया भटनागर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धनंजय पवार यांनी भूषवले, तर संस्थेचे अध्यक्ष किरण साळवे यांनी आयोजनाची जबाबदारी सांभाळली.
संस्थेच्या दोन वर्षांतील सामाजिक कार्याचा आढावा दृकश्राव्य माध्यमातून सादर करण्यात आला. विशेषतः अंध विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुमधुर संगीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था प्रमुखांचा शाल, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात अनिट्य कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डॉ. छाया भटनागर यांच्या विद्यार्थिनींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
No comments:
Post a Comment