Tuesday 24 September 2024

गोरेगाव गणेश दर्शन स्पर्धा 2024 बक्षीस वितरण सोहळा दिमाखात संपन्न

गोरेगाव गणेश दर्शन स्पर्धा 2024 बक्षीस वितरण सोहळा दिमाखात संपन्न 

सामाजिक आणि शैक्षणिक संस्था असलेल्या साई लीला फाउंडेशनच्या वतीने गोरेगाव गणेश दर्शन स्पर्धा 2024 च्या बक्षीस वितरण सोहळयात मोठया संख्येने विविध मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमात आरटीआय कार्यकर्ते आणि पत्रकार अनिल गलगली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अनिल गलगली यांच्या हस्ते गोरेगाव पश्चिम भगतसिंग नगर येथील शरद मित्र मंडळाला 21,000 रुपयांचे प्रथम रोख पारितोषिक देण्यात आले. द्वितीय रोख पारितोषिक ( रु.15000 ) गोरेगांव पूर्व येथील न्यू फाइव स्टार सेवा मंडळाला देण्यात आले तर तिसरे रोख पारितोषिक ( रु. 11,000 ), गोरेगाव पश्चिम येथील जवाहरनगरच्या राजाला देण्यात आले. सर्वच मंडळात उत्साहाचे वातावरण होते. आणि सर्वांनी मिळून आगामी काळात साई लीला फाऊंडेशनच्या सहकार्याने समाजोपयोगी शिबिरे आयोजित करण्याचा निर्धार केला. सूत्रसंचालन अध्यक्ष असलेल्या रश्मी उपाध्याय यांनी केले तर व्यवस्था श्रद्धा कदम यांनी पाहिली.या कार्यक्रमात पत्रकार अंकित मिश्रा आणि ज्येष्ठ समाजसेवी शेखर नाईक पण सहभागी झाले होते. वेगवेगळ्या ठिकाणी गणेशोत्सव मंडळास भेट देत आयआरएस समीर वानखेडे, कामगार नेते अभिजीत राणे आणि अभिनेते रमेश गोयल यांनी मंडळास प्रोत्साहन दिले

No comments:

Post a Comment