Tuesday, 23 August 2022

माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत साजरा केला हादगे सरांचा अमृतमहोत्सव

मुंबईतील प्रसिद्ध असे कुर्ला पश्चिम वाडीया इस्टेट येथील कराची हायस्कूलचे माजी शिक्षक दत्तात्रय हादगे यांचा अभीष्टचिंतन सोहळा नुकताच पार पडला. सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत अमृतमहोत्सव साजरा करत हादगे सरांना शुभेच्छा दिल्या.

कुर्ला पश्चिम येथील कराची हायस्कूलच्या सभागृहात माजी शिक्षक दत्तात्रय हादगे यांचा अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. दत्तात्रय हादगे यांनी अमृत महोत्सव साजरा केल्याबद्दल सर्वाचे आभार मानले. यावेळी त्यांचे वडील अर्जुन हादगे, पत्नी सुजाता हादगे, माजी मुख्याध्यापक घनश्याम पुजारी, माणिक काळे हे मान्यवर उपस्थित होते. श्रीनिवास सावंत यांच्या आयोजनाअंतर्गत शाळेतील शिक्षक, माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केली. यावेळी अनिल गलगली, वझीर चांद मुल्ला, राजेंद्र मालुसरे, दिलीप गोलतकर, अनंत पालव, भालजी महाडिक, विजय खानोलकर, किशोर परब, तुकाराम ठुबे, जयवंत पांचाळ, उदय म्हात्रे, सुशील भोवर, रवी हडकर , वंदना रानडे, विलास कापसे, हरिष चाळके, मोहन आंबेकर व अन्य माजी विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाचे संचालन नागेश हुणावणे यांनी केले.

संघर्षनगर के छात्र - छात्राओं के लिए माध्यमिक विद्यालय के लिए प्रयास करुंगी- शबाना आजमी

चांदिवली के संघर्ष नगर के 10वीं और 12वीं के छात्र-छात्राओं का मेधावी समारोह और करियर मार्गदर्शन समारोह का आयोजन निवारा हक सुरक्षा समिति के माध्यम से कम्युनिटी भवन किया गया.  इस कार्यक्रम में लगभग 200 छात्रों और उनके अभिभावकों ने भाग लिया. पूर्व सांसद पद्म भूषण शबाना आज़मी ने कहा कि संघर्षनगर के छात्र - छात्राओं के लिए माध्यमिक विद्यालय के लिए प्रयास करुंगी.

इस अवसर पर आरटीआई कार्यकर्ता अनिल गलगली, साकीनाका थाने के पंकज परदेशम, वरिष्ठ अधिकारी उत्तम धागे, काउंसलर रामेश्वरी पाटिल, दीपक दाते ऑफ निवार, तानाजी कांबले, रामभाऊ गजकोश, विनीता स्टेफन, अनीता जाधव, शेख साहब, सोनवणे काकी, संयोजक संजय डावरे मंच पर मौजूद थे।

इस समय संघर्ष नगर की संस्थापक पूर्व सांसद पद्म भूषण शबाना आज़मी ने बताया कि संघर्ष नगर में एक प्राथमिक विद्यालय के लिए संयुक्त प्रयास किया। इसी तरह, आइए एक साथ प्रयास करें और माध्यमिक विद्यालय को शुरु किया जाए. उन्होंने सभी छात्रों को उनके भविष्य के करियर के लिए शुभकामनाएं भी दीं। उत्तीर्ण छात्रों को स्मृति चिन्ह, प्रशस्ति पत्र, तुलसी के पौधे और कलम देकर सम्मानित किया गया।

कार्यक्रम का संचालन निवारा हक्क सुरक्षा समिती  के समन्वयक संजय डावरे ने किया।  इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए अनीता जाधव, रावण गायकवाड़, वसंत खाड़े, अशोक पाटिल, दिलीप जाधव, प्रकाश शिंदे, मिरजोलकर काका, माणिक शिंदे, सुभाष शिंदे, वीरेंद्र मिश्रा, रेखा हलदनकर, अंसारी ताई, गीता नाचरे, पाटिल ताई, गीतांजलि ताई, इमरान शेख, रमेश कांबले , श्याम कांबले, प्रकाश दाहिजे, विजय गायकवाड, भाई चौहान ने विशेष परिश्रम लिया.

Friday, 8 April 2022

प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्यासाठी पालिकेने खर्च केले 27.10 लाख

बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सन 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेले भौगोलिक सीमा राज्य सरकारने रद्द केल्या आहेत. पण या प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्यासाठी पालिकेने एकूण 27.10 लाख  रुपये खर्च केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस निवडणूक कार्यालयाने दिली आहे.


आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  निवडणूक कार्यालयाकडे प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्यासाठी आलेल्या खर्चाची माहिती मागितली होती. निवडणूक कार्यालयाने अनिल गलगली यांस कळविले की प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्यासाठी पालिकेने एकूण 27.10 लाख रुपये खर्च केले आहे. यात प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्यासाठी शासकीय मुद्रण व लेखन सामग्री संचालनालय यांना 19.87 लाख रुपये इतक्या रक्कमेचे अधिदान करण्यात आले आहे. तसेच हरकती व सूचना या कार्यक्रमासाठी हॉलच्या भाड्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांना 3.97 लाख देण्यात आले आहे. अधिकारी-कर्मचारी यांच्या भोजनासाठी मेसर्स सेंट्रल कॅटरर्स यांस 1.53 लाख, व्हिडीओ शूटिंग, एलईडी स्क्रीन करिता मे. आरंभ एंटरप्रायजेसयांना 1.52 लाख रुपये, स्टेशन करिता मे. वसंत ट्रेडर्स यांना 18 हजार आणि मेसर्स विपुल यांस 189 रुपये देण्यात आले आहे.

अनिल गलगली यांच्या मते नियोजन न करता केलेला खर्च वाया गेला कारण राज्य सरकारने सीमा रद्द केल्या आणि त्यामुळे मुंबईकरांच्या करातून जमा झालेल्या पैश्यांची उधळपट्टी झाली आहे. 

मनपा ने मॉडल वार्डों की भौगोलिक सीमाओं के निर्धारण के लिए 27.10 लाख रुपये खर्च किए

राज्य सरकार ने वर्ष 2022 में मनपा के आम चुनाव के लिए खींची गई भौगोलिक सीमाओं को रद्द कर दिया है। हालांकि, चुनाव कार्यालय ने आरटीआई कार्यकर्ता अनिल गलगली को सूचित किया है कि मनपा ने इन मॉडल वार्डों की भौगोलिक सीमाओं को निर्धारित करने के लिए कुल 27.10 लाख रुपये खर्च किए हैं।

आरटीआई कार्यकर्ता अनिल गलगली ने मनपा चुनाव कार्यालय से मॉडल वार्डों की भौगोलिक सीमाओं के सीमांकन में हुए खर्च की जानकारी मांगी थी। चुनाव कार्यालय ने अनिल गलगली को बताया कि मनपा ने मॉडल वार्डों की भौगोलिक सीमाओं के सीमांकन के लिए कुल 27.10 लाख रुपये खर्च किए हैं। मॉडल वार्डों की भौगोलिक सीमाओं के प्रकाशन हेतु शासकीय मुद्रण एवं लेखन सामग्री निदेशालय को 19.87 लाख रुपये की राशि प्रदान की गई है। साथ ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान को आपत्ति और सुझाव कार्यक्रम के लिए हॉल का किराया के तौर पर 3.97 लाख रुपए अदा किया। अधिकारी-कर्मचारी भोजन के लिए मेसर्स सेंट्रल कैटरर्स को 1.53 लाख, मेसर्स आरंभ को वीडियो शूटिंग, एलईडी स्क्रीन के लिए 1.52 लाख रु. वसंत ट्रेडर्स को 18,000 रुपये और मेसर्स विपुल को 189 रुपये अदा किए गए।

अनिल गलगली के अनुसार, अनियोजन के चलते राज्य सरकार ने सीमा को रद्द कर दिया और मुंबईकरों के टैक्स के पैसे की बर्बादी हुई।

https://fb.watch/ceGD-veG9j/

पालिकेने अनिल गलगली यांस माहिती अधिकार कायदा अंतर्गत दिलेले उत्तर

Monday, 28 March 2022

परिचारिकांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा- अनिल गलगली

परिचारिकांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा- अनिल गलगली

केईएम नर्सेस वेलफेयर सोसायटीचे वार्षिक स्नेह संमेलन

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी परिचारिका समुदायाचे सार्वजनिक आभार मानत प्रतिपादन केले की कोरोना काळात डॉक्टरांच्या बरोबरीने परिचारिका यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरी बजावली आणि त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. अश्या परिचारिका यांना सर्व स्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

केईएम नर्सेस वेलफेयर सोसायटी २०२२ च्या कार्यकारिणीने केईएम परिचारिका इमारत परिसरात वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना निमंत्रित करण्यात आले होते. परिचारिकेच्या कार्याबद्दल त्यांनी आदर व्यक्त करत भविष्यात त्यांना येणा-या अडचणी या प्रशासनापर्यंत पोहचवून सकारात्मक निराकरण करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. रूग्ण मित्र विनोद साडविलकर यांनी केईएमच्या परिचारिकेच्या सहकार्याने गरीब गरजू रुग्णांना मदत होत असल्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

वार्षिक स्नेहसंमेलनास मेट्रन प्रतिमा नाईक, सिस्टर इंचार्ज मेघना गांगुर्डे, असिस्टंट मेट्रन लता कांबळे, सिस्टर इन्चार्ज रिध्दी राणे, वाॅर्ड असिस्टंट रविंद्र वरखडे, सिस्टर ट्यूटर ज्योत्सना जाधव, सिस्टर इन्चार्ज श्वेता परब, निलीमा शिंदे, स्टाफ नर्स श्रुती गमरे, सायली माने, स्नेहा पाटील, प्रज्ञा देसक व सहकारी परिचारिका यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण उत्तमरित्या केले. मेट्रन प्रतिमा नाईक यांनी अनिल गलगली व विनोद साडविलकर यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला. याप्रसंगी सर्व परिचारिकांनी नृत्य, गाणी अन्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुरेख आयोजन केले.

#अनिलगलगली #मुंबई2022 #KEMHospital #केईएमरुग्णालय #परिचारिका #नर्स #वार्षिकस्नेहसंमेलन

https://www.facebook.com/764999096874209/posts/7395554467151939/


Tuesday, 22 March 2022

125 मंडलों ने मिलकर कुर्ला में मनाई शिव जयंती

कुर्लेकर ने ' एक हुए कुर्लेकर एक शिवजयंती सर्वत्र' घोषित कर वर्ष 2019 से उसी दिन यानी फाल्गुन वद्य तृतीया को शिव जयंती मनाने का फैसला किया। कुर्ला में 125 सार्वजनिक मंडल, संगठन, राजनीतिक दल एक साथ आए और एक साथ जुलूस निकाला गया। वर्ष 2019, वर्ष 2020 में भव्य तरीके से शोभायात्रा निकाली गई। लेकिन वर्ष 2021 में कोरोना संकट के कारण कोई भव्य जुलूस नहीं निकला। लेकिन इस साल कुर्लेकर ने एक साथ आकर शिव जयंती को भव्य जुलूस के साथ मनाया। इस साल का उत्साह कुछ अलग था। ढोल, पारंपरिक हल्गी वाद्ययंत्र, श्रीकृष्ण क्रीड़ा मंडल की लड़कियों की लेज़िम मंडली, शिव-युग के हथियारों का प्रदर्शन, छत्रपति शिवाजी महाराज और मावला बने कलाकारों ने सभी का ध्यान खींचा। इस जुलूस में शिवराय की पालकी का कुर्ला के हर स्थान पर स्वागत किया गया। इस जुलूस में कुल 5000 नागरिक मौजूद थे।

इस जुलूस में पारंपरिक वेशभूषा में महिलाओं ने श्री सर्वेश्वर मंदिर में शिवराय का झूला का प्रदर्शन किया। पुलिस उपायुक्त प्रणव अशोक ने छत्रपति शिवाजी महाराज का माल्यार्पण कर स्वागत किया। इस मौके पर विधायक मंगेश कुडालकर, सूचना अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली, पूर्व नगरसेविका डॉ अनुराधा पेडणेकर, मनोज नाथानी, छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती के उमेश गायकवाड, गणेश चिकणे, दिलीप सराटे, भानुदास गाडे, अजय बालू यादव, किरण सुर्वे, किशोर सोनावणे, अजय शुक्ला, किरण दामले के साथ सभी राजनीतिक दल, मंडल के पदाधिकारी की उपस्थिती थी। इस भव्य दिव्य जुलूस में कुर्लेकरों में उत्साह का माहौल बन गया था।

125 मंडळांनी एकत्र येऊन कुर्ल्यात साजरी झाली तिथीनुसार शिवजयंती

'झाले कुर्लेकर एकत्र एकच शिवजयंती सर्वत्र' अशी घोषणा करून कुर्लेकरांनी सन 2019 सालापासून शिवजयंती एकाच दिवशी म्हणजे फाल्गुन वद्य तृतीयेला साजरी करण्याचे ठरवले. कुर्ल्यातील 125 सार्वजनिक मंडळे , संस्था, राजकीय पक्ष एकत्र आले आणि एकत्रित मिरवणूक काढण्यास सुरुवात केली. सन 2019, सन 2020 अशा दोन वर्षी भव्य स्वरूपात मिरवणूक काढण्यात आली होती. परंतु सन 2021 साली कोरोनाच्या संकटामुळे भव्य मिरवणूक होऊ शकली नाही. परंतु यंदाच्या वर्षी कुर्लेकरांनी एकत्रित येऊन भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून शिवजयंती साजरी केली. यंदाचा जल्लोष काही वेगळाच होता. ढोल ताशे, पारंपरिक हलगी वादन, श्रीकृष्ण क्रीडा मंडळाच्या मुलींचे लेझीम पथक, शिवकालीन शस्त्रकला प्रात्यक्षिके, छत्रपती शिवराय व मावळयांच्या वेशात कलाकार यांनी सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. या मिरवणुकीतील शिवरायांच्या पालखीचे प्रत्येक मंडळ स्थानी जल्लोषात करण्यात आले. या मिरवणुकीत एकूण 5000 नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.

या मिरवणुकीत श्री सर्वेश्वर मंदिरात महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शिवरायांचा पाळणा सादर केला. पोलिस उपायुक्त प्रणव अशोक यांनी छत्रपती शिवरायांना हार घालून स्वागत केले., याप्रसंगी आमदार मंगेश कुडाळकर, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, माजी नगरसेविका डॉ अनुराधा पेडणेकर, मनोज नाथानी, छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समितीचे उमेश गायकवाड, गणेश चिकणे, दिलीप सराटे, भानुदास गाडे, अजय बाळू यादव, किरण सुर्वे, किशोर सोनावणे, अजय शुक्ला, किरण दामले तसेच सर्व राजकीय पक्षांचे आणि मंडळांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. या भव्यदिव्य मिरवणुकीने कुर्लेकरांमध्ये उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.