Wednesday 10 October 2018

बेघरांना आपला लढा स्वतःच लढावा लागणार

मुंबईतील बेघरांस आपला आवाज उंचावणार लागणार आहे आणि आपली लढाई स्वतःला लढावी लागणार आहे. बुधवारी जागतिक बेघर दिनिम्मित जेजे रुग्णालयाच्या जवळील पदपथावर राहणा-या बेघर लोकांसमेत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली आणि बृजेश आर्य यांनी त्यांच्या समस्या आणि आणि शासनाद्वारे उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत चर्चा केली. 

आज "जागतिक बेघर दिन" ​​होता. मुंबईत वर्ष 2011 च्या जनगणना अनुसार 57,416 नागरिक बेघर आहेत पण प्रत्यक्षात विविध संस्था/संघटना यांच्यानुसार मुंबईत 2 लाख पेक्षा अधिक नागरिक बेघर आहेत. आज ते अन्न, नागरी आणि निवाराच्या सुविधांसाठी झगडत आहेत.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले की आज बेघरांना शासनातर्फे विविध योजनांच्या माध्यमातून ज्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे.शिद्यावाटप पत्रिका, वोटर आयडी आणि शाळेत मोफत शिक्षण मिळाले पाहिजे. पहचान या संस्थेचे अध्यक्ष बृजेश आर्य म्हणाले की नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी सुद्धा सकारात्मक पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी लीना पाटील, सुभाष रोकड़े, नसीम शेख, शीला पवार, शहजादी आणि मीरा यादव उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment