Monday 1 October 2018

एम्सच्या धर्तीवर मुंबई सहित महाराष्ट्रात वैद्यकीय सुविधासी संलग्न असणाऱ्याना बायोमेट्रिक हजेरीतून वगळा

एम्समध्ये वैद्यकीय सुविधासी संलग्न असणाऱ्याना बायोमेट्रिक हजेरीतून वगळण्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एम्सने दिली आहे. मुंबई सहित महाराष्ट्रात वैद्यकीय सुविधासी संलग्न असणाऱ्याना एम्सच्या धर्तीवर बायोमेट्रिक हजेरीतून वगळण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस लिहिलेल्या पत्रात केली आहे. 


आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एम्सकडे माहिती मागितली होती की एम्समध्ये डॉक्टरांना बायोमेट्रिक हजेरीतून वगळण्यात आले आहे आणि त्याची माहिती देण्यात यावी. एम्सचे संगणक विभागाचे प्रोफेसर डॉ ए शरीफ यांनी अनिल गलगली यांना कळविले की एम्समध्ये एम्समध्ये वैद्यकीय सुविधासी संलग्न असणाऱ्याना बायोमेट्रिक हजेरीतून वगळण्यात आले आहे. अनिल गलगली यांच्या मते मुंबई सहित महाराष्ट्रात आज मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि कर्मचारी वृंदाची कमतरता आणि प्रचंड प्रमाणात रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. अश्या परिस्थितीत डॉक्टर आणि अन्य संबंधित कर्मचाऱ्यांना परिस्थितीच्या दृष्टिकोनातून काम करावे लागते आणि कधी कधी तर जास्त वेळ दयावा लागतो पण सरकार किंवा महानगरपालिका ओव्हर टाईम देत नाही. त्यामुळेच एम्सच्या धर्तीवर मुंबई सहित महाराष्ट्रातील सरकारी, निम्म सरकारी आणि महानगरपालिकेच्या रुग्णालयात बायोमेट्रिक हजेरेची जाचक अट रद्द करण्यात यावी.


No comments:

Post a Comment