Wednesday 20 March 2024

पश्चिम रेल्वेपेक्षा मध्य रेल्वेचा एस्केलेटर देखभाल अधिक खर्चिक

पश्चिम रेल्वेपेक्षा मध्य रेल्वेचा एस्केलेटर देखभाल अधिक खर्चिक

प्रति एस्केलेटर पश्चिम रेल्वेचा खर्च 1.85 लाख तर मध्य रेल्वेचा 2.97 लाख

मध्य रेल्वेला वर्षाला 1.13 कोटींचे आर्थिक नुकसान


मुंबई उपनगर रेल्वे सेवेतील एस्केलेटर हे प्रवाश्यांच्या सुविधेसाठी बसविण्यात आले असले तरी नेहमीच यात बिघाड असतो. एका एस्केलेटरच्या देखभालीवर पश्चिम रेल्वे 1.85 लाख वर्षाला खर्च करते तर मध्य रेल्वे 2.97 लाख रुपये खर्च करत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे एस्केलेटरच्या बाबत विविध माहिती विचारली होती. पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता शकील अहमद यांनी अनिल गलगली यांस कळविले की चर्चगेट ते विरार या दरम्यान 106 एस्केलेटर आहेत. एका एस्केलेटरचा प्रतिवर्षं देखभाल खर्च हा 1.85 लाख आहे. तर मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता एच एस सूद यांनी अनिल गलगली यांस कळविले की सीएसटीएम ते कल्याण आणि सीएसटीएम ते वाशी या दरम्यान 101 एस्केलेटर आहेत. एका एस्केलेटरचा प्रतिवर्षं देखभाल खर्च हा 2.97 लाख आहे. 

1825 वेळा बंद पडते एस्केलेटर

पश्चिम रेल्वेने बंद होणाऱ्या एस्केलेटरची माहिती देताना स्पष्ट केले आहे की एका वर्षात 1825 वेळा एस्केलेटर बंद पडते. 95 टक्के आपत्कालीन बटन अज्ञात व्यक्तीकडून बंद केल्याने एस्केलेटर बंद होते. तर मध्य रेल्वेच्या एच एस सूद यांनी बंद एस्केलेटरची माहिती जतन न केल्याची कबूली दिली आहे. विशेष दिवशी बंद असलेल्या एस्केलेटर माहिती विचारली तर ती दिली जाऊ शकते.

No comments:

Post a Comment